प्राचार्य डॉ, शरद कुलकर्णी व प्राचार्य महेंद्र शिंदे यांचा सत्कार

लोकदर्शन 👉महादेव गिरी

दि 10 /12 2021.   वालुर येथील नुतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व क्षीरसागर डिजिटल स्मार्ट व कोचींग क्लास यांच्या वतीने, नुतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी सर. व नवनिर्वाचीत प्रभारी प्राचार्य डाॅ. महेंद्र शिंदे सर यांचा सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. भगवान क्षिरसागर यांनी केले.
व नुतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पर्यावरण तज्ञ तथा राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी सर यांनी आपले मनोगत फोनद्वारे पुणे येथून व्यक्त केले.
तर ईतर विद्यार्थी मनोगत डॉ. गणेश जैस्वाल, बालाजी हारकळ. राजेश साडेगावकर. गोपाळ उदावत.शशिकांत अप्पा यांनी केले. विद्यार्थ्यांनी माजी प्राचार्य कुलकर्णी सर यांच्या अनेक आठवनींणा उजाळा दिला.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती वालुर गावचे सरपंच संजयभाऊ साडेगावकर, उपसरपंच गणेशराव मुंढे,ज्येष्ठ ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत आबा चौधरी .डाॅ दिपेश्वर रासवे सर.डाॅ. गणेश जैस्वाल. दायमाजी, देशमाने सर आदींची उपस्थिती होती .
सत्कारमूर्ती माजी प्राचार्य शरद कुलकर्णी सर व प्राचार्य महेंद्र शिंदे सर यांनी सत्कारपर मनोगत व्यक्त केले.
तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जालींदर होलगीरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत चौधरी,राहुल खपले.अक्षय परभणकर. स्वपनील हारकळ.रुशिकेश सुरंगे. यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here