भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जखमी* *बसस्थानक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करा – विवेक बोढे

लोकदर्शन 👉मोहन भारती


गुरवार 9 डिसेंबर रोजी सकाळी दरम्यान सिद्धार्थ मेश्राम (45) रा. लहुजी नगर, किशोर मंगर (38) रा. चिंचाडा व दुर्वास मुन ( 62) रा. घुग्घुस हे बसस्थानक चौकात नास्ता करून रस्त्याच्या कडेला उभे असतांना डस्टर क्रमांक एमएच 14 डीएन 7569 च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवत असतांना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभे असलेल्या तिघांना धडक दिली यात तिघेही जखमी झाले.

सिद्धार्थ मेश्राम व किशोर मंगर हे मजूर असून ते कामासाठी घुग्घुस येथे आले होते व दुर्वास मुन हे दिघेही सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास बसस्थानक चौकात एका चहा नाश्त्याच्या टपरी वर नास्ता करून उभे होते तितक्यात डस्टरच्या चालकाने आपले भरधाव वाहन चंद्रपूरच्या दिशेने घुग्घुसकडे घेऊन येत असतांना बसस्थानक चौकात उभे असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली यात सिद्धार्थ मेश्राम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर किशोर मंगर व दुर्वास मुन हे किरकोळ जखमी झाले.
जखमी अवस्थेत सिद्धार्थ मेश्राम व किशोर मंगर यांना प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले ही माहिती मिळताच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सुरेंद्र भोंगळे व तुलसीदास ढवस यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच प्रा. आ. केंद्रात जाऊन जखमी मजुरांची तात्काळ वैद्यकिय मदत मिळवण्यासाठी मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.

धडक देऊन वाहन चालकाने तिथून पळ काढला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली तसेच पोहवा महेंद्र भुजाडे, प्रकाश करमे व मंगेश निरंजने यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त डस्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे जमा केले.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस येथील बसस्थानक चौकात वाहतूक वाढलेली आहे वारंवार अपघात घडत आहे त्यामुळे या चौकात प्रशासनाने पोलीस बूथ व वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी रेटून धरली.

घुग्घुस पोलिसांनी फरार चालक विरुद्ध कलम 279, 337, 338 गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *