कळमना येथे स्मशानभूमीचे चैन फिनिशिंग व सौंदर्यकरण कामाचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जिल्हा परिषद जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीचे चैन फिनिशिंग व सौंदर्यकरण या विकास कामांसाठी जि. प. सदस्य नामदेवराव करमनकर यांच्या निधीमधुन मंजुर विकासकामांचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी तमुस अध्यक्ष महादेव पाटील ताजने, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे ग्रा प सदस्य रंजना दिवाकर पिंगे, सुनिता ऋषी उमाटे, साईनाथ पिंपळशेंडे, दिपक झाडे, प्रियंका गेडाम, ग्रामसेवक नारनवरे, कवडु पाटील पिंगे, विठठल पाटील वाढई, धोडु पाटील सुमटकर, अशोक पाटील कावळे, विनायक धांडे, गुलाब अटकारे, मनोज गेडाम, पंडीत गेडाम , सुधाकर पिंगे, विजय मुठलकर, सावन गेडाम, शिपाई विठ्ठल नागोसे, सुनील मेश्राम यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *