

लोकदर्शन 👉 मोहन भारती
◆_तालुका कृषी यंत्रणा(आत्मा), क्रुषी विभाग व अंबुजा सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन.
३० शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे वितरण.
राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव (घानागुडा) येथे तालुका कृषी यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग राजुरा व अंबुजा सिमेंट उप्परवाही, (BCI) यांच्या संयुक्त विद्यमानाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘ फवारणी करतांना घ्याव्हयाची काळजी, साहित्यांचा योग्य वापर व हाताळणी ‘ याबाबतचे प्रशिक्षण परिसरातील शेतकरी बांधवांना देण्यात आले. या प्रसंगी ३० शेतकरी बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरक्षा किट साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना फवारणी करतांना कोणती काळजी घ्यायला हवी, फवारणी उपकरने कशा पद्धतीने हाताळायचे, विषबाधा झाल्यास काय प्रथमोपचार घ्यायला पाहिजेत अशी अनेक उपयुक्त माहिती तज्ञांनी शेतकऱ्यांना दिली. तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आत्मा समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की या प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा उपयोग आपल्या शेतशिवारी फवारणी करताना करून शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी तसेच योग्य तंत्रज्ञान व अध्यायात माहितीच्या आधारे सुरक्षित आणि प्रगतीशील शेती करावे.
या प्रसंगी तालुका कृषी यंत्रणा / आत्मा सल्लागार समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, ACF, BCI चे विशाल भोगावार, देवाडाचे कृषी पर्यवेक्षक रत्नाकर गांदगीवार, चव्हान साहेब, कृषी सहाय्यक राजशेखर पुरमचट्टीवाड, पाचगाव चे कृषी सहाय्यक रंगन्नाथ खटिंग, हेमराज साळवे प्रक्षेत्र अधिकारी, ACF, BCI चे प्रक्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर, गोपाल जंबुलवार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.