पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन*

By 👉. Shankar Tadas

नागपूर, दि. 26 : संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्यावतीने आयोजित संविधान चौक येथील कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बहुधा संबंध राज्यात पालकमंत्र्यानी उद्दिशिकेचे जाहीर वाचन करण्याची आणि इतरांकडून करून सामूहिकरीत्या वाचन करून घेण्याचा हा अभिनव प्रयोग म्हणता येईल.

भारतीय संविधानाच्या अंतिम मसुद्याला घटना समितीने मंजुरी देवून 72 वर्षे झाली. हे संविधान रुजले असून आजही ते टिकून आहे, याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगायला हवा, असे पालकमंत्री डॉ. राऊत यावेळी म्हणाले. तसेच देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे डॉ.राऊत म्हणाले की, आज कधी नव्हे ते राज्यघटनेला मोडीत काढण्याचे आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार व हक्कांवर बेकायदेशीर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. आपल्या हाताखालील संस्थांचा गैरवापर करण्यात येत आहे. हे पाहता, डॉ.आंबेडकर यांनी इंगित केलेल्या धोक्यांचा विचार अधिक सजगपणे व गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे.

जेव्हा घटनात्मक मार्गांचा वापर करूनही सामाजिक व आर्थिक प्रगतीचे ध्येय आपण साकारू शकणार नाही. त्यावेळी असंवैधानिक मार्गांचा पाया रचला जातो. हे मार्गच पुढे अराजकतेचे व्याकरण ठरते, असा इशारा डॉ. बाबासाहेबांनी दिला होता.
विरोधकांचा आवाज बंद करण्याचे सारे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. यातून लोकशाही मजबूत होत नाही तर त्याला अनेक तडे जाण्याची भीती आहे. विरोधकांचे विचार लोकशाहीला मारक नाही तर लोकशाही समृद्ध करणारे आयुध आहे, ही धारणा डॉ. आंबेडकरांची होती. या धारणेला गेल्या काही वर्षात बासनात बांधण्याचे काम केंद्र सरकार करताना दिसत आहेत. एक पक्षीय हुकूमशाही या देशावर लादण्याचे प्रयत्न होताना दिसत असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

आज अंधभक्तांची लाट देशात उसळली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. ही मानसिकता देशाला खूप घातक असल्याचे त्यांनी तेव्हाच स्पष्ट केले होते. लोकशाही, संमिश्र अर्थव्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक विचारसरणी यामुळे गेल्या 75 वर्षात या देशाने मोठी प्रगती केली.

सामाजिक व राजकीय समतेवर या देशाची घटना आधारित असल्यामुळे येथील दलित,आदिवासी,ओबीसी, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय व स्त्रियांना आपला विकास करून घेण्याची संधी दिली असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

या प्रसंगी नगरसेवक प्रफुल गुडधे, नारु जिचकार, शिवदास वासे (कार्यक्रमाचे अध्यक्ष), टा.बी. देवतळे (आय.पी.एस.), कास्ट्राईब संघटनेचे कृष्णा इंगळे, डॉ.विजय माहुरे, विलास सुटे (कोषाध्यक्ष), सच्चिदानंद दारुंडे, पी.आर. पुडके, ललित खोब्रागडे (वि.का.अ., ऊर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई), अशोक कोल्हटकर, सेवक बेतल, पानाचंद फुलमाळी, माजी न्यायाधीश केवळ गोटे, गोपीचंद कांबळे, दक्षायण सोनवणे, मिलिंद बन्सोड, विजय मधुमस्के, गणेश उके, वनमाला उके, तक्षशिला वागधरे, कल्पना मेश्राम, अर्चना खोब्रागडे, मार्गा खोब्रागडे, अरुण भगत, दिनेश ढाकणे, सुरेश तामगाडगे, बोधी फाऊंडेशन, शाक्यमुनी मेमोरियल ट्रस्ट, समता सैनिक दल, जिंदा भगत, व्होकेशनल एज्युकेशन एंड ट्रेनिंग बुध्दिष्ट एम्प्लॉईज असोशिएशन-केतन सोनवणे, प्रभाकर वालके, बाळकृष्ण सुखदेवे, मंदा वैरागडे, रुंदाताई ठाकरे, नंदिनी सुदाम, निमिक्षा वैरागडे, विजय शेंडे, बानाई, विजय बेले, करुणा बुध्दीस्ट असोशिएशन प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अनिल हिरेखन यांनी सूत्र संचालन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *