आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारा मार्फत निवेदन

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

कोरपना – आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या दोन्ही आरोग्य सेवक परीक्षेत घोळ झाला. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कोरपना मार्फत विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार , माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर,
माजी आमदार संजय धोटे , भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्या नेतृत्वात
निवेदन देण्यात आले.
यावेळी दिनेश सुर जिल्हा सचीव , दिनेश खडसे, अभय डोहे, आशिष देवतळे, शुभम झाडे अमोल खाडे आदीसह मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चा चे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्र्याचा निषेध ही करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here