कापूस पांढऱ्या सोन्याला हया वर्षी चांगली मागणी कापसास 10 हजारांहून अधिकचा भाव मिळण्याची शक्यता.

लोकदर्शन 👉मोहन भारती

➡️ *राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन.*

कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात. हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेशात आताच खासगी खरेदी ही 7,500 पेक्षा अधिक दराने सुरू आहे. यापुढेही याच पातळीच्या वर 7,500 ते 8,000 या दर पट्ट्यातच ही खरेदी सुरू राहू शकते. मागणीचा जोर वाढल्यास किंमती रु.10,000 चा टप्पाही गाठू शकतात. सध्या सरकार दरबारी होत असलेल्या नोंदीच्या आधारे, कॉटन फेडरेशन आणि सीसीआय या संस्थांनी सुधारित अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार, यंदा राज्यात 75 लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. यापूर्वी 85 लाख गाठींचे उत्पादन जाहीर केले गेले होते. नव्या अंदाजासाठी सरकारी पंचनाम्यांचा आधार घेतला गेला आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसान पंचनाम्यांहून कितीतरी अधिक आहे.

➡️ *कॉटन फेडरेशन व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरु होणार..*

कॉटन फेडरेशनचे महाव्यवस्थापक जे. पी. महाजन यांनी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापसाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मागणीबरोबरच देशांतर्गत मागणीही अधिक असल्याने कापसाला यंदा चांगला दर राहील, असे महाजन यांचा अनुमान आहे. त्यांनी सांगितले, की सरकारी कापूस खरेदी केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू केली जाणार आहेत. कॉटन फेडरेशन राज्यभरात 70 तर सीसीआय विदर्भात 40 खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांनी मिळून राज्यात 15 लाख गाठींची खरेदी केली होती. मात्र, यंदा खासगी खरेदीचा जोर आणि अधिक भाव यामुळे सरकारी खरेदी कमी राहू सकते. गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर गर्दी होती.

✳️ *_कसे असेल कापसाचे गणित..?_*

एक क्विंटल कापसापासून 34 किलो रुई व 64 किलो सरकी मिळते.

• 15 सेंट एक पाउंड परळीचा भाव ( 1 बेल = 187 किलो रुई)

• 34 किलो रुईचे (187 x 34 ) = 6363

• 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलो प्रमाणे 1920 रुपये

• एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250 एकूण प्रक्रिया खर्च व्यापारी नफा 1250 रुपये वजा केले तर सात हजार रुपये होतात.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *