सत्यशोधक विद्यापीठात होणार साहित्यरत्नाचा सन्मान

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर

मुरबाड :

: महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर असणारी संस्था म्हणजे साहित्य व सांस्कृतिक अकादमी पुणे व इंटरनॅशनल लिटरेचर ॲड कल्चरर ॲकाडमी दिल्ली, या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा आचार्य प्र.के.अत्रे राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक प्रविण खोलंबे.यांना जाहीर झाला आहे.

मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असलेले प्रविण खोलंबे.हे साहित्य , संस्कृती व सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन करत आहेत.त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले वैचारिक लेख हे अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक लेखन केलेले आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेला ‘महाराष्ट्राची लोककला ‘ हा संदर्भ ग्रंथ , अनेक वैचारिक लेख , २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत.
४० हुन अधिक ठिकाणी कविसंमेलनात सहभागी होऊन कविता सादर केल्या आहेत. अनेकवेळा त्यांच्या कविता पुणे आकाशवाणी केंद्रावर अभिवाचन केल्या आहेत.
तर, नाशिक आकाशवाणी केंद्र व जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत.

तर, नाशिक आकाशवाणी केंद्र व जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत.
मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक असुन समाज, संस्कृती व साहित्य लेखनासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्थांचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यंदाचा आचार्य प्र.के अत्रे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.यवतमाळ येथील सत्यशोधक विद्यापीठात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

*** प्रवीण खोलंबे यांची प्रेसनोट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *