सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात सर्व मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहचणार

By : प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :

बुलढाणा लोकसभा मतदासंघांअंतर्गत असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदासंघातील 3लाख 14हजार 78मतदारापर्यंत 20एप्रिल पावतो घरपोच व्होटर स्लीप शासकीय कर्मचाऱ्यामार्फत पोहचवली जाईल, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रा संजय खडसे यांनी आज देऊळगाव राजा येथे पंचायत समितीच्या सभागहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली,
लोकसभा निवडणुक संदर्भात सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघ ची सविस्तर माहिती दिली,या मतदासंघात एकूण मतदार संख्या 3,15,145असून, मतदान केंद ची संख्या 336आहे यात ग्रामीण भागात 299मतदान केंद्र आहे,
85वर्ष वरील मतदार ची संख्या 539असून दीव्यांग मतदार ची संख्या 89आहेत, एकूण 628मतदारांना घरुन मतदान करता येईल,
सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात 336 मतदान केंद्राध्यक्ष , व 67राखीव असे एकूण 403 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त केले आहे, तेवढेच मतदान अधिकारी 1,2, 3नियुक्त कऱण्यात आले आहेत, याशिवाय 58 मायक्रो ऑब्झरवर, 54एस एस टी कर्मचारी,48 एफ एस टी कर्मचारी,24 वी एस टी कर्मचारी,आणि 248 अंतर्गत व्यवस्थापनासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती प्रा खडसे यांनी दिली,या मतदारसंघ करिता एकूण 1350 ई वि एम मशीन प्राप्त होणार आहेत, या मतदारसंघात 8आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 30 हजार शालेय विद्यार्थी कडून संकल्प पत्र,भरून घेतले जाते आहे, शिवाय कलापथक, मिरवणुकी च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले, 75टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली, पत्रकार परिषदेत पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मुख्याधिकारी अरुण मोकळ , गट विकास अधिकारी मुकेश माहोर ,नायब तहसिलदार बालाजी कौशल्य तथा इतर अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *