नाशिक शहरात रंगणार राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा

 

by : Ganesh Bhalerao

नाशिक : भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षातील (सब ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य अशा राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील पंचवटी नाशिक च्या मैदानावर 2 से 5 डिसेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष भारतीय सचिव मिनाक्षी गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी दिली. भारतील विविध 25 राज्य तील मुले व मुलीचे संघ या स्पर्धेत समावेश होणार आहे त्यामध्ये यजमान संघ महाराष्ट्र पण सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (3 नोव्हेंबर) सकाळी संपन्न होणार आहे.खेळाडू ची राहन्याची व्यवस्था ,पदाधिकारी व पंच यांची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुलाचे वसतीगृह नाशिक येथे करण्यात आली असून ,पंचवटी नाशिक च्या मैदानावर दोन ग्राउंड तयार करण्यात येणार असून स्पर्धेची तयारी उत्साहात होत आहे तसेच क्रिकेट सदस्य क्रिकेट प्रेमी या क्रीडाशिक्षक क्रीडाप्रेमी महाराष्ट्र व नाशिक शहरातील खेळाडूंनी उपस्थितीत राहून आनंद घेण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी केले या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी भारतीय टेनिस क्रिकेट चे फाउंडर कन्हैया गुजर व भारतातील राज्यातील सचिव व अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे या
राज्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सचिव मीनाक्षी गिरी,धनश्री गिरी वुमन्स डायरेक्टर महाराष्ट्र राज्य , डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे , विलास गिरी, महेश मिश्रा , धनभाऊ लोखंडे व जिल्हा सचिव विलास गायकवाड गणेश भालेराव तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सचिव
परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी 8421023200
जिल्हा सचिव विलास गायकवाड 9921133303

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *