चंद्रपूर : अचानक वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला असता त्याच्या बैलांनी जिवाची बाजी लावून मालकाला वाचविले. 21 आक्टोबरला दुपारी 2 वाजता चिंतालधाबा येथील मोरे हा शेतकरी आपले बैल राखत असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरड केल्यावर दोन्ही बैल मालकाला वाचविण्यासाठी वाघावर चाल करून गेले. दोन्ही बैलांनी शिंग व पायांनी वाघाला तुडवायला सुरवात केली. त्यामुळे वाघ जंगलात पडून गेला. बैलांनी “जान कि बाजी ” लावून आपल्या मालकाला वाचविले. वाघाने पाठीवर, छातीवर पंजा मारल्याने शेतकरी जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.