डॉ कुलभूषण मोरे रुग्नसेवक पुरस्काराने सन्मानित

  1. By : Shivaji selokar

गडचांदूर : अर्थ फाउंडेशन चे प्रमुख डॉक्टर कुलभूषण मोरे यांना ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन चंद्रपूर तर्फे रुग्णसेवक पुरस्काराने श्री रघुवीर अहीर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गड्चान्दुर येथील बालाजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ स्वप्निल टेम्भे (ता लुका आरोग्य अधिकारी ) डॉ प्रवीन येरमे, डॉ शारदा येरमे (संचालक ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन) , पांडुरंग जाधव (संचालक ,जिल्हा मध्यवर्ती बँक ) , सविताताई टेकाम (नगराध्यक्ष गडचान्दुर), शरद जोगी (उपनगराध्यक्ष) हे उपस्थित होते . डॉ मोरे यानी केलेल्या जीवती आणि कोरपना तालुक्यात अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिर , मोतीबिंदु शिबिर, महिला मासिक पाळी जन जागृती अभियान ,सेनेटरी नैपकिन्स प्रोजेक्ट , कुपोषित बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच कोविड काळात केलेली जनजागृति आणि रक्तदान शिबिर आयोजित करून निस्वार्थ आरोग्य सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला… डॉ मोरे याना यापुर्विही अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ, कुलभूषण मोरे यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here