धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी, गडचांदूर येथे भोजनदान

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथील बुद्ध विहारात गुरुवारी सायंकाळी भंते कश्यपच्या समवेत बुद्ध वंदना घेण्यात आली. तद्नंतर अशोककुमार उमरे यांनी बाबासाहेबांच्या आंदोलनातील निस्वार्थी, त्यागी आणि स्वाभीमानी कार्यकर्त्यांचे चळवळीतील योगदानाबद्दल माहिती दिली.

यानंतरच्या घेण्यात आलेल्या बैठकीत येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोज शुक्रवारला बुद्धभूमी येथे खिर व भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सामुहिक बुद्ध वंदना आणि बैठकीस भंते कश्यप समवेत रमेश पाटील सर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक, राहुल उमरे- आरोग्य सभापती तथा नगरसेवक न.प. गडचांदूर, दत्तू तोडासे, संपादक प्रभाकर खाडे, प्रा. भानुदास पाटील, सुरेश धोंगडे, अशोककुमार उमरे, सुनिल वागदे, सुनिल फुलझेले, दशरथ नरवाडे, देवराव भगत, राजकुमार दुर्गे, गोसावी चांदेकर, शिवाजी धुपे, मच्छिंद्र वाघमारे, शिला आ. निरंजने, आशिल निरंजने, सटकू निषाद, शंकर भगत, सुभाष वाघमारे, महेश ससाने, विक्की मून, चिंतामणी घुले इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here