शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज दिनांक १६ आॅक्टोबर रोज शनिवारला आ. धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील माजी उपसरपंच प्रभाकर पैकन कोडापे आणि माजी सदस्य बुच्चीराम अर्जुन आत्राम यांनी काँगेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आबाजी पाटील ढुमने, पाचगाव चे माजी सरपंच शंकर गोणेलवार, सिंधी चे उपसरपंच रामभाऊ ढुमने, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, धनराज चिंचोलकर, मंगेश रायपल्ले, राजकुमार दमिलवार, दिपक वांढरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here