डाॅ. बाबासाहेबांचे राष्ट्रोध्दारात बहुमूल्य योगदान – हंसराज अहीर*                                                             

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

*⭕महामानवास धम्मदीक्षा वर्धापन दिनी भावपूर्ण आदरांजली*

चंद्रपूर:- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर न्यायाचा, हक्काचा आणि समतेचा लढा लढतांनाच आपल्या लाखो अनुयायींना बौध्द धम्माची दीक्षा दिली. आज या ऐतिहासिक सोहळ्याला 65 वर्षे पूर्ण होत आहे. या धम्म सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी परमपुज्य डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी बोलतांना त्यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की, बाबासाहेबांची देशाप्रती आस्था व निष्ठा होती. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी त्यांचे योगदान शब्दापलीकडचे आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्षच केला नाही तर तो न्याय मिळेपर्यंत ते झटले. या देशाच्या मातीत रूजलेला भगवान गौतम बुध्दांचा धम्म स्विकारून त्यांनी आपल्या महानतेचे दर्शन घडविले आहे. या महामानवांच्या मानवी हक्काच्या क्रांतीलढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासने व तो पुढे घेऊन जाणे हे नव्या पिढीचे लक्ष्य असले पाहिजे असे सांगीतले.
या प्रसंगी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी, राजेश मुन, ब्रिजभुषण पाझारे, रवि आस्वानी, जयश्री जुमडे, छबु वैरागडे, खुशबु चैधरी, पुष्पा उराडे, प्रकाश धारणे, अॅड. राहु घोटेकर, धम्मप्रकाश भस्मे, सविता कांबळे, शितल गुरणुले, सुभाष कासनगोट्टुवार, राजेंद्र अडपेवार, रवि गुरणुले, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, धनराज कोवे, राजु घरोटे, माया उईके, शाम कनकम, सचिन कोतपल्लीवार, सुनिल डोंगरे, डाॅ. भारती दुधानी, राजकुमार आकेपेल्लीवार, स्वप्नील कांबळे, निलेश हिवराळे, महेंद्र जुमडे, राजेश यादव, राजेश थुल, जितेश वाकडे, नुतन मेश्राम, सागर भगत, आकाश ठुसे, निश्चय जवादे, पराग कांबळे, राहुल मेंढे, निखिल देवगडे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी डाॅ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *