नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना लाच घेताना अटक!

By : Mohan Bharti

भिवंडी महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना लाचलुचपत (ACB) विभागाने 50 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. पद्मानगर येथे भिवंडी महानगरपालिकेने रस्ते रुंदीकरण केल्यानंतर स्थानिक दुकानदारांना त्यांची दुकाने दुरुस्ती करण्यासाठी मौखीक परवानगी दिली होती. मात्र, लेखी परवानगी नसल्यामुळे नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांनी दुकानदारांना ब्लॅकमेलींग करुन २ कोटी रुपयांची, व राजकुमार ज्ञानोबा चव्हाण यांचे कवाड येथील फार्म हाऊस लाच मागितली होती. त्यात आज ५० लाखांची रोख मागितले होते. दुकानदारांनी स्वतःची दुकाने तोडून महानगरपालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी सहकार्य करूनही नगरसेवक ब्लॅकमेलींग करत असेल तर, जनता महानगरपालिकेला कसे सहकार्य करेल? आधीच जनता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय ठप्प असताना पालिकेला सहकार्याची भूमिका घेऊनही नगरसेवकाने पैशाची मागणी केल्याने व्यापाऱ्यांनी नाईलाजाने लाचलुचपत विभागाला कळवून सापळा रचून 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून दिले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here