

By : Mohan Bharti
राजुरा :– गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशन च्या वतीने दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोज रविवार ला 11 वाजता मातोश्री विद्यालय सभागृह तुकुम चंद्रपूर येथे संघटना प्रबोधन सभा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेचे अध्यक्षस्थान यंग टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. बबनराव तायवाडे सर हे भूषविणार असून याप्रसंगी नागपूर पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय ऍड.अभिजित वंजारी यांचा आणि सेवानिवृत्त सन्मानीय प्राचार्य महोदयांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. प्रदीप घोरपडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर सभेत संघटनेतील सर्व पदाधिकारी, विभाग समन्वयक आणि सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन चे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय गोरे ,सचिव प्रा.डॉ.विवेक गोरलावार तथा संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.