महाराष्ट्राच्या महसुली गावातील शेतजमिनीची तेलंगणाकडून मोजणी

लोकदर्शन
_____________________________________________
० महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष
० तेलंगणाची मुजोरी कायम

शंकर चव्हाण ० जिवती(चंद्रपूर)
—————————————

जिवती :- गेल्या अनेक वर्षापासून सिमावादात अडकलेल्या १४ गावातील नागरिकांची मने जिंकण्यासाठी तेलंगणा सरकारकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहे तर दुसरीकडे माञ गावे महाराष्ट्राची असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तेलंगणा राज्याचे चांगलेच फावले आहे.महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे तेलंगणा शासन या गावांमध्ये सोयी-सुविधा पुरवित येथील दहा ते पंधरा हजार एकर जमिन आपल्या ताब्यात घेतली आहे आणि आता महाराष्ट्राची महसुली गावे म्हणून ओळख असलेल्या १४ गावातील लोकांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी तेलंगणा वनविभाच्या वतीने शेतजमिनीची मोजणी केली जात असल्याचा प्रकार सुरू असून हि शेतजमिनीची मोजणी पट्टे देण्यासाठी आहे की तेलंगणा सरकार ताब्यात घेण्यासाठी आहे याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हि १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा निर्वाळा झाला आहे.तेलंगणा सरकारचा या गावांवर कुठलाही अधिकार नसतानाही शेतजमिनीची मोजणी दोन-तिन दिवसापासून चालू असून महाराष्ट्र सरकार माञ बघ्याची भुमिका घेत आहे.
महाराष्ट्राच्या महसूली जमिनीवर वास्तव्यास असलेल्या मुकादमगुडा,परमडोली,तांडा,कोठ्ठा,लेंडीजाळा,शंकरलोधी,महाराजगुडा,पदमावती,अंतापूर,इंदिरानगर येसापूर,पळसगुडा,भोलापठार,लेंडीगुडा या वादाग्रस्त १४ गावात संपूर्ण भाषिक नागरिक आहेत.न्यायमुर्ती फाजल अली समितीच्या सीमारेषेनुसार १९६२-६३ पासून ही गावे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत वसलेली असून महाराष्ट्राची महसुली गावे असतानाही सीमेवरील या १४ गावांना जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न नेहमीच सतावत आहे. आजपर्यंत अनेकवेळा महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे मिळवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले. पण त्याची पुर्ततः केली नाही.महाराष्ट्राची गावे असतानाही महाराष्ट्र शासनाकडून येथिल लोकांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा फायदा तेलंगणा सरकार घेत आहे.आता तर १४ गावातील नागरिकांच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीची जमिनीचा मालकी हक्क देण्यासाठी तेलंगणा वनविभागाकडून जोमात मोजणी सुरू आहे.या आधी सुध्दा बंजारा व आदिवासी शेतकऱ्यांना आंध्र सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत.आंध्र प्रदेशमधून विभागणी करून तेलंगणा राज्य बनविण्यात आले असून १४ गावातील शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीची सरसकट मोजणी करून ज्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे नाही अशा शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यासाठी तेलंगणा सरकारच्या वनविभागाने शेतजमिन मोजणी करित असल्याचे तेलंगणा वनविभागाकडून सांगितले जात आहे.
_____________________________________________
१४ गावातील शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीची सरसकट मोजणी करून ज्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे नाही अशा शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तेलंगणा सरकार देणार असून त्यासाठी वनविभागाकडून मोजणी सुरू आहे.

जी.भिमराव
फाॕरेष्ट सेक्टर आॕफिसर परमडोली
_____________________________________________
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देत तेलंगणा सरकारच्या वनविभागाकडून महाराष्ट्राच्या महसुली गावातील शेतजमिनीची मोजणी केली जात असून महाराष्ट्र शासनाने तातडीने चौकशी करावी
रामदास रणविर
सामाजिक कार्यकर्ता मुकादमगुडा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *