महाविकास आघाडीच्या विकास कामांना मतदारांचा कौल

नागपूर जि. प. निवडणुकीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

नागपूर, ७ आॅक्टोबर- नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून मतदारांनी महाविकास आघाडीच्या विकास कामांना पावती दिली आहे, अशी
प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर जि. प. निवडणुकीत काँग्रेसला १६ पैकी  ९ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ व शेकापला एका मतदारसंघात विजय मिळाला आहे. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळविता आला. पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेसला दिल्ेल्या भरघोस मतांनी काँग्रेसने जिल्ह्यात राबविलेल्या विकास कामांना लोकांनी स्वीकारले आहे असेही डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

विजयी उमेदवारांचे अभिनंदन
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रैस व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी अभिनंदन केले आहे. विजयी मिरवणुका काढताना उमेदवारांनी कोरोनाच्या
नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here