राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे अखेर गडचांदूर पोलिसांनी बुजविले,,.                               ब                       

लोकदर्शन 👉मोहन भारत

 


गडचांदूर,,,
गडचांदूर ते आदीलाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील संततधार पावसामुळे पडलेले मोठं मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, दररोज होणाऱ्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले,या महामार्ग ची तातडीने दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे, मात्र दुर्लक्ष केले,
गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी मानवतेच्या दृष्टीने विचार करून आज गांधी जयंती च्या दिनी अपघाताला कारणीभूत ठरणारे आसन जवळील खड्डे स्वतः जातीने उपस्थित राहून पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत खड्ड्याची दुरुस्ती केली,
याप्रसंगी पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, पोलीस कर्मचारी धर्मराज मुंढे,व्यंकटेश भटलाडे उपस्थित होते,
पोलीस विभागाच्या या स्तुत्य उपक्रम चे सर्वत्र कौतुक होत आहेत,
सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण महामार्ग ची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे असे सर्वसामान्य जनतेला वाटते,
,।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here