आर्वी तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी दिलीप डाखरे.

लोकदर्शन  👉 मोहन भारती

 

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा आर्वी ग्रामपंचायत येथे आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सरपंच शालूताई विठ्ठल लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. यात आर्वी गावातील तंटामुक्ति समिती अध्यक्षपदासाठी इच्छुकांना संधी देण्यात आली. एकूण ३ इच्छुकांनी नावे दिली. मात्र गावातील नागरिकांनी जवळपास एकतर्फी कल दाखवून दिलीप बाबुराव डाखरे यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड केली.
ग्रा.पं. आर्वी महात्मा गांधी तंटामुक्त समीती मध्ये उपाध्यक्ष म्हणून मोरेश्वर मालेकर, सदस्य म्हणून सरपंच शालूताई लांडे, ग्रा प सदस्य सुभाष कावडे, मारोती महाकुळकर, व्यापारी प्रतिनिधी सुरन माथनकर, महिला बचत गट प्रतिनिधी माया बावणे, सुवर्णा महाकुलकर, मागासवर्गीय प्रतिनिधी प्रफुल्ल उपरे, संजय तलांडे, विद्यार्थी प्रतिनिधी निखील सोनटक्के, युवा प्रतिनिधी राहुल खेडेकर, प्रतिष्ठित व्यक्ती बाबुराव बोढाले, ग्रा प सचिव जे. एस. चंदनखेडे, याची तर नियंत्रक म्हणून आर्वीचे पोलीस पाटील महामाया खेळूरकर, कापनगावचे पोलीस पाटील गणेश सानहारे आदींची निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *