प्रायोगिक शेती आणि प्रगतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची गरज. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन👉मोहन भारती

⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शेतकरी कार्यशाळेचे उद्घाटन.

कोरपना, जिवती येथे शेतकऱ्यांचे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण.

कोरपना :– कृषी विभाग कोरपना आणि जिवती द्वारा शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण आणि शेती विषयक माहिती देण्यासाठी कोरपना व जिवती येथे शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात शेती हाच प्रमुख व्यवसाय असून येथील शेतकर्‍यांना प्रायोगिक शेती आणि उन्नतीसाठी कृषी विभागाने त्यांना निरंतर प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळेतून शेतकऱ्यांना शेती विषयक अध्ययावत माहिती, शेतीतील नवनवीन प्रयोग, बीज प्रक्रिया, उन्हाळी पिके, फळबाग, पशुपालन, जोडधंदे, हंगामी पिके, पिक विमा, बोंडअळी व अन्य रोगांवर उपाय अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मिळेल, शेतकर्‍यांनी देखील माती परीक्षण करून गुणवत्ता पुर्ण पिके घेणे, एकाच पिकांवर अवलंबून न रहाता विविध पर्यायाचा अवलंब करणे, राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी कोरपना येथे जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी पल्लवी गोडबोले, जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि. प. सदस्य सुरेश मालेकर, कोरपना शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष घनश्याम नांदेकर, जिवती शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष सोमाजी सिडाम, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपसरपंच भिमराव पवार, अंबुजा फौंडेशन चे दिपक साळवे, दत्ता तोगरे, राशी सीड्स मार्केटिंगचे वेदरकर, पोलीस अधीक्षक भीमराव मेश्राम, शोभाताई मडावी, सिताराम मडावी, आनंदराव जाधव, पंढरी मदेवाड, रोशन आस्वले यासह स्थानिक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *