राजुऱ्यात गोरे व पिदूरकर कुटुंबाने दाखविला समाजाला मुहूर्ताचा ‘आरसा.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा-सध्या सगळीकडे लग्नाची धूम सुरू आहे.विवाह सोहळ्यातुन दोन अनोळखी कुटुंब नातेसंबंध घट्ट करीत असल्याने वरवधुच्या घरात मोठा उत्साह पहायला मिळत असतो.पंचांगानुसार तारीख व घटी मुहूर्त काढल्या जातो.आणि याच मुहूर्तावर लग्न पार पडावे असे नातेवाईकांना वाटत असते.पण याच पवित्र संस्काराचा मुहूर्त चुकवून वरवधूच्या डोक्यावर ‘अक्षता’ टाकण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार नजरेस पडत आहे. पण या प्रकाराला फाटा देत गोरे व पिदूरकर कुटुंबाने घटी मुहूर्तावर ‘शुभ मंगल सावधान’ करून समाजाला ‘आरसा’ दाखवला आहे.त्यांच्या याच आदर्श विवाहाची दखल घेत नवदाम्पत्यासह कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला आहे. …
. जीवनातला विवाह सोहळा हा एक पवित्र संस्कार मानल्या जातो.याच विवाहातुन दोन कुटूंबियांचे ऋणानुबंध बांधले जाते व दोन जीवाचे मिलन होत असते.त्यामुळे या शुभ प्रसंगाला कोणतेही गालबोट लागू नये याची वरवधु कडून विशेष काळजी घेतली जाते. हा मंगलमय सोहळा पंचांगानुसार घटी मुहूर्तावर व्हावा असे नातेवाईकांना वाटत असते.पण प्रत्येक्षात मात्र याच मुहूर्ताची ऐसीतैशी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळच्या मुहूर्ताचे लग्न दुपारी लागत असल्याने नातेवाईकांमध्ये रोष पहायला मिळत असतो. पण शहरातील प्रा डॉ संजय गोरे व ईश्वरावर पिदूरकर रा.मोरवा यांनी आपल्या मुलांच्या लग्नातील एक वेगळाच आदर्श दाखवून दिला आहे.मृणाल व अमोल यांचा विवाह मुहूर्त हा सकाळी अकरा वाजता होता.अमोल यांनी मोरव्यावरून वाजतगाजत वरात आणली.त्यामुळे पुन्हा एकदा मुहूर्त टाळणार असे अनेकांना वाटत होते.पण या दोन्ही कुटुंबियांनी विवाहाच्या पवित्र संस्काराच्या मुहूर्ताचा सन्मान राखत घटी मुहूर्तावर लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, वेळेवर लग्न लागल्याने अनेक नातेवाईकांना वधुवरावर’अक्षता’ सुध्दा टाकता आल्या नाही.पण सध्या याच मुहूर्ताच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गोरे व पिदूरकर या कुटुंबाने वेळेवर ‘शुभ मंगल सावधान’ केल्याने त्यांचा हा आदर्श समाजासाठी ‘आरसा’ दाखवणारा आहे अशी चर्चा ऐकायला मिळत होती. ….
या दोन्ही कुटुंबियांनी समाजाला चपराक लावल्याने माजी आमदार सुदर्शन निमकर भारावुन गेले व त्यांनी मृणाल व अमोल या नवविवाहित जोडप्याला बालाजीचे शेषवस्त्र व त्यांच्या कुटुंबाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.या मंगलमय सोहळा प्रसंगी आमदार सुभाष धोटे , माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ गोटे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब वासाडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,विमाशी चे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे ,राजेंद्र वैद्य, दिनेश चोखारे, सतीश घोटे,डॉ. प्रदीप घोरपडे ,वासुदेव गोरे,किसनराव डोंगे, इत्यादी मान्यवर मंडळींनी वरवधुला शुभ आशीर्वाद देत मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडल्याबद्दल कुटुंबियांचे कौतुक केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *