जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ,गडचांदूर च्या हॉल करीता खासदार निधी मधून 25 लाख मंजूर।

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती,,,,
गडचांदूर,,
जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ,गडचांदूर ला हॉल तयार करण्यासाठी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप खेकडे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, डॉ, के.आर.भोयर, डॉ प्रदीप ठाकरे,डॉ स्वप्नेश चांदेकर, डॉ पंकज देरकर, डॉ जयदीप चटप, डॉ रोहित गोवरदीपे, डॉ धनंजय बुऱ्हाण,आदींनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आरोग्य शिबीर घेण्यासाठी एक सुसज्ज हॉल तयार करण्या करिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देऊन आग्रह केला, बाळूभाऊ धानोरकर यांनी तात्काळ जनहितार्थ 25 लक्ष रुपये चा निधी मंजूर केल्याबद्दल जनरल मेडिकल असोसिएशन ने आभार मानले आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *