पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मनोरुग्णालयाला सदिच्छा भेट

स्थानिक प्रादेशिक मनोरुग्णालयात महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण, आपत्ती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या शुभ हस्ते गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येवून पूजा-अर्चना करण्यात आली,
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
वै. उपअधीक्षक डॉ. श्रीकांत करोडे, मनोविकारतज्ञ डॉ. आशिष कुथे, अधीसेविका अल्का महाजन, डॉ. अनंतवार, कार्यालयीन प्रमुख शुभा सलामे, परिचर प्रमुख दिलीप भारती प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात मनोरुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेत उत्कृष्ट रुग्णसेवेची प्रशंसा केली. व उपचार घेत असलेल्या मनोरुग्णा सोबत संवाद साधला. तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
संचालन डॉ सूर्यकांत ढेंगरे यांनी केले. आभार ज्योती फीस्के यांनी मानले. रुग्णांना मिठाई वितरित करण्यात आली.
कार्यक्रमात बालाजी कोल्हे, वसंता सोंमकुवर, प्रशांत गायकवाड, मनोज मधुमटके, रुपाली ठाकरे, रिना खुरपुडी, दिनेश श्रीखंडे, रवींद्र गोटेकर, मुन्ना मस्करे, उमेश सांगोळे, प्रदीप पाटील, राजकुमार ठाकूर, राहुल मोतलींगे, अक्षय वालदे, मुरली चौधरी, प्रशिक गेडाम, प्रशांत जैन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here