*म्युकरमायोसिस ग्रस्त शेतकऱ्याला जिल्हा बँकेतर्फे आर्थिक मदत. गोरगरीबांच्या पाठीशी.विजयराव बावणे.

By : Mohan Bharti

कोरपना – कोरपना येथील शेतकरी हरिदास मारोती झाडे .यांना म्युकरमायोसिस आजाराचा उपचार करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे चाळीस हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते देण्यात आला. शेतकरी कल्याण निधी अंतर्गत ही सदर आर्थिक मदत बँके तर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे.नेहमी गोरगरीबा साठी झटनारा नेता म्हणुन त्याची ओळख निर्माण केली.
याप्रसंगी कोरपना शाखेचे शाखा व्यवस्थापक एस जी बुचुंडे , इस्माईल शेख , सुमित्रा झाडे व बँकेचे कर्मचारी पत्रकार उपस्थित होते.जिल्हा बँकेच्या या योजनेमुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना याचा संकट काळात आर्थिक लाभ मिळत असल्याने मोठा गोरगरीबांला आधार मिळाला झाडे परीवाराने संचालक विजयराव बावणे याचे अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here