साई शांती युवा गणेश मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

गडचांदूर :सध्या कोविड बरोबरच डेंगू ने देखील तोंड काढले आहे अश्या परिस्थितीत रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. याचेच भान राखत साई शांती युवा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद मंडळा कडून व्यक्त करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अरविंद डोहे यांनी केले. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रासकर सर, पाचभाई सर, बोंडे सर, वरारकर सर, गायकवाड सर, दीपक खेकारे,लीलाधर मते, प्रणित अहीरकर, विनोद टोगे, व रक्तपेढी चंद्रपूर येथील डॉ गावीत, डॉ पाचारणे सह चमू उपस्थित होता. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी वैभव राव, नीलेश चिने, सुमीत नागे, अभिजीत पाचभाई, गौरव राव, आकाश गायकवाड, मयूर येडमे, सूरज बोबडे, अक्षय मेश्राम, अतुल बोबडे, संकेत बोधे, सुहास बोंडे, दत्तू पानघाटे,समीर येडमे, अंकित जाधव, संकेत लांडे, उकल बोधे, नितीन टावरी, तन्मय पानघाटे, यश वैद्य,नीरज मालेकर, पवन चौहान, विपुल जोगी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here