राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची येत्या बुधवारी बैठक, शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा

By : Mohan Bharti 

२०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झालेले तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांची, आजी-माजी आमदारांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. बुधवार (८ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही नियोजित बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र, शरद पवार यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक येत्या बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर २०१९ साली निवडणूक लढून विजयी झालेल्या तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी स. ९ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here