इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्योत्सवानिमित्त इन्फट जिसस सोसायटीच्या सर्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १५ आँगस्ट २०२१ रोज रविवारला सकाळी ठिक ७ : ४५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेचे संचालक अभिजित धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट जुनियर काॅलेजचे प्राचार्य समिर पठाण, कल्याण नर्सिंग काँलेजचे प्राचार्य पुजा गीते, इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *