जिवती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– २४ जून २०२१
तहसील कार्यालय जिवतीच्या वतीने पंचायत समिती हाॅल येथे दुपारी १२:०० वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध विभागाच्या कार्यालयीन अधिकार्‍यांची आढावा घेण्यात आली. यात सर्व विभागाने योग्य समन्वय साधून कामकाज वेळेवर पूर्ण करणे, येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे, जनकल्याणकारी कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण सुचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रसंगी जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते एकूण १७ सतरंजीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पं. स. सभापती अंजनाताई पवार, तहसीलदार बनसोडे, गटविकास अधिकारी एस. आस्कर, मुख्याधिकारी कविता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी एस. मालवी, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राजुरा ओ. एस. दराडे, अन्नपुरवठा विभाग निरीक्षक सविता गंभीरे, पोलीस निरीक्षक साईनाथ अंबिके, उपविभागीय अभियंता दी. प. मिश्रा, सहाय्यक अभियंता ए. जे. शेंडे, सहाय्यक अभियंता कुणाल येनगंदेवार, तालुका कृषी अधिकारी पालवी गोडबोले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, पं. स सदस्य अनिता गोतावळे, सुग्रीव गोतावळे, अश्फाक शेख, दत्ता तोगरे, शब्बीर पठाण, ताजुद्दीन शेख, भिमराव पवार, कलीम भाई शेख, मारूती कुंभरे, रामदास पतंगे, रामदास रणविर, विलास वाघमारे यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *