जिल्‍हा रूग्‍णालयाला पुन्‍हा 15 मोठे व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध* दि

दि 26/4/2021 लोकदर्शन
*⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांची हाक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्‍मक प्र‍तिसाद*

चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना व व्‍हेंटीलेटर व ऑक्‍सीजनचा तुटवडा भासत असतांना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने 15 एनआयव्‍ही आणि 2 मिनी व्‍हेंटीलेटर जिल्‍हा रूग्‍णालयासाठी दोन दिवसापुर्वी उपलब्‍ध केले. आज पुन्‍हा 15 मोठे व्‍हेंटीलेटर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांना सुपुर्द करत या समस्‍येवर उपाययोजनेसाठी आरोग्‍य यंत्रणेला सहकार्य केले आहे.

26 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत 15 मोठे व्‍हेंटीलेटर जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांना जिल्‍हा रूग्‍णालयासाठी सुपुर्द करण्‍यात आले. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टुवार, रविंद्र गुरनुले, ब्रिजभुषण पाझारे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महानगर जिल्‍हा कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, देवानंद वाढई, विठ्ठलराव डुकरे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, रवी लोनकर, सचिन कोतपल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

कोरोना रूग्‍णांची संख्‍या चंद्रपूर जिल्‍हयात दिवसेंदिवस वाढत आहे. व्‍हेंटीलेटरचा तुटवडा सुध्‍दा मोठया प्रमाणावर जाणवत आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध करण्‍याबाबत विनंती केली होती. नेहमी प्रमाणेच नितीनजींनी आमच्‍या विनंतीला सकारात्‍मक प्रतिसाद देत 15 एनआयव्‍ही व दोन मिनी व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध केले व आज पुन्‍हा 15 मोठे व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध केले. विकासकामे असो वा लोकोपयोगी उपक्रम आम्‍ही हाक द्यायची व नितीनजींनी त्‍याला सकारात्‍मक प्रतिसाद दयायचा हे समीकरण गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्‍हा अनुभवत आहे. त्‍यांच्‍या दातृत्‍वाला आपण वंदन करतो अशी भावना व्‍यक्‍त करत चंद्रपूरकर जनतेच्‍या वतीने आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. यावेळी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड यांनी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *