कार्यशाळा पत्रकारितेतील जनसंवादाची…..

सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी “पत्रकारितेतील जनसंवाद” ही कार्यशाळा झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिनांक ०६ एप्रिल,२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिकणारे एकूण ८१ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मास मीडिया आणि कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय , माध्यमात त्याचं महत्त्व काय आहे , मीडिया मध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे यासह अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन पत्रकार डॉ. गीतांजली घोलप यांनी संवादातून केला.

पत्रकारिता म्हणजे वर्षाचे ३६५ दिवस, दिवसातील २४ तास , ऊन-वारा-पाऊस या सर्व गोष्टींना सामोरं जाऊन करण्याचं एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्राचा आधार घेऊन आपण आपल्या समाजाचे प्रश्न मांडू शकतो, व्यक्त होऊ शकतो. अश्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या. पत्रकारिता क्षेत्रात मुलगी आहे म्हणून तुला कामात मुभा दिली जाईल असं काहीही नसतं. मुलगा-मुलगी हा भेद अजिबात नसतो. प्रत्येकवेळी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. रोजचा दिवस तुम्हांला काहीतरी नवीन शिकवून जातो, तुमच्यासाठी रोजचा दिवस नवा असतो अश्या अनेक सकारात्मक बाजू डॉ. गीतांजली यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.त्याचबरोबर माध्यमातील करिअरच्या वाटा नेमक्या काय आहेत यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर डॉ. गीतांजली यांनी दिले असून बी.एम.सी च्या विद्यार्थ्यांचे व मीडिया अकादमीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. या मीडिया अकादमीच्या या वर्कशॉपचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

©शुभम शंकर पेडामकर

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *