*भाजपचा विचार घराघरात पोहचविण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प करा — माजी आमदार अँड संजय धोटे* *

 

*भाजपच्या ४१ व्या पक्ष स्थापना दिनानिमित्त माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*
👉दि 6/4/2021 शिवाजी सेलोकर
भारतीय जनता पक्ष हा देशात एक नंबरचा पक्ष मनुन ओळखल्या जाते,भाजपचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता आहे,पक्ष भेद विसरून कोणत्याही सामाजिक कार्यात नेहमी आपली मोलाची भूमिका बजाविण्या करिता समोर येतो अश्या पक्षाचे आपण कार्यकर्ते असून यापुढेही अशेच कार्य करणे गरजेचे आहे,भाजपचा विचार घराघरात पोहचविण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प करा व जनसेवे साठी पुढे येण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले,

आज दिनांक 6 एप्रिल2021 रोज मंगळवार ला भाजपा जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे भाजपाच्या 41 व्या पक्ष स्थापना निमित्त माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात पंडित दिनदयाल उपाध्यय व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली,भारत माता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अश्या यावेळी घोषणा देण्यात आल्या,यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,

यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर सुनिल उरकुडे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव वाघूजी गेडाम,जिल्हा सचिव हरिदास झाडे,जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार,नगरपरिषदचे सभापती राधेश्याम अडानीया,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,भाजपा नेते महादेव तपासे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,सुरेश रागीट,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य भाऊराव चंदनखेडे,मिलिंद देशकर,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मोहन कलेगुरवार,गणेश रेकलवार,कैलास कार्लेकर,विलास खिरटकर,सुरेश धोटे,रत्नाकर पायपरे,जनार्धन निकोडे,तुलराम गेडाम,जितेंद्र देशकर,अशोक वांढरे,पराग दातारकर,संदीप मडावी आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *