३ आक्टोंबरला नांदाफाटा येथे मोफत नेत्र, अस्थीरोग, मेंदूरोग, स्त्रीरोग तपासणी शिबीर

ग्रामदूत फाऊंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे आयोजन

शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर :

ग्रामदूत फाऊंडेशन नांदा व ग्रामसंवाद सरपंच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र, अस्थीरोग, मेंदूरोग व मेंदूविकार तसेच स्त्रीरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ३ आक्टोंबरला नांदाफाटा येथील श्री.शिवाजी इंग्लिश स्कुल व ज्यूनिअर काॅलेज येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत शिबीर पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर राऊत राहतील. उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक करतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, प्राचार्या डॉ.अलेक्झांड्रीना डिसूझा, प्राचार्य अनिल मुसळे, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक संजय शर्मा, उपव्यवस्थापक कर्नल दीपक डे, ग्रामदूतचे अध्यक्ष रत्नाकर चटप, ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे एड.देवा पाचभाई उपस्थित राहतील. शिबीरात चंद्रपूरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश राठोड, नेत्रतज्ञ डॉ.प्रतिभा चव्हाण राठोड, मेंदूरोग व मेंदूविकार तज्ञ डॉ.कपिल गेडाम, प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉ.श्वेता कपील गेडाम हे तज्ञ डॉक्टर रुग्नांची मोफत तपासणी व रोगनिदान करणार आहेत.

मोफत आरोग्य तपासणीचा परिसरातील नागरिकांनी सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन ग्रामदूत फाऊंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या वतीने रुपेश विरुटकर, प्रकाश उपरे, प्रमोद वाघाडे, रामकृष्ण रोगे, संदिप खिरटकर, मुरलीधर बोडके, अविनाश पोईनकर, एड.दीपक चटप, रवी बंडीवार, प्रमोद खिरटकर, प्रितम मेश्राम, प्रशांत कोप्पुला, गणेश पिंपळकर, रामा चिंचोलकर, चंदू झुरमुरे, प्रशांत जोगी, अशोक पानसे, सतिश लोनबले, अमोल वाघाडे, चंदू राऊत, विशाल भिमेकर, अरुण काळे, राजेंद्र खेडकर, रवी बेरड, दिनेश राऊत, अजित शेख व सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here