विविध शासकीय योजनांचा गरजूंना लाभ देऊन केला वाढदिवस साजरा.

By : Mohan Bharti

गडचांदूर : राजुरा नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष . श्री. अरूणभाऊ धोटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गडचांदुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक साई मंदिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या,मध्ये मतदान नोंदणी. राशन कार्ड नूतनीकरण व दुय्यम प्रत. संजय गांधी निराधार योजना.
कोविड -19 लसीकरण. या योजनांना शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. मिळाला, नगराध्यक्ष.श्री अरुण भाऊ धोटे यांनी आपल्या मनोगतात सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकला. गडचांदुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविताताई टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली, झालेल्या कार्यक्रम मध्ये जेष्ठ नेते पापय्याजी पोन्नमवार श्री. विठ्ठलराव थिपे कोरपणा तालुकाध्यक्ष, जेष्ठ नेते श्री. हंसराज चौधरी,सौ.अर्चना ताई आंबेकर गडचांदुर महिला अध्यक्ष,श्री . विक्रम येरणे गटनेते नगरपरिषद गडचांदुर, सौ.अर्चना शिवाजी वांढरे सभापती महिला व बाल कल्याण न.प. गडचांदुर, श्री.अरविंद मेश्राम नगरसेवक न.प. गडचांदुर,शैलेश लोखंडे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष,रूपेश चुधरी युवक काँग्रेस अध्यक्ष गडचांदुर,मकसुद अली,प्रितम सातपुते,कय्युम खान,रोहित शिंगाडे,विलास मडावी,तुकाराम चिकटे,प्रणय टेकाम,संजय चिकटे राहुल थेरे व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व गडचांदुर तलाठी यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष वांढरे यांनी केले तर प्रास्ताविक श्री. विक्रम येरणे यांनी केले व आभार प्रदर्शन अतुल गोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here