वालुर परीसरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान.

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी

सेलु तालुक्यातील वालुर येथे दि.27 सप्टेंबर सोमवार रोजी वालुर येथे मध्यरात्री 2 वाजेपासुन मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस धो धो सुरू होता.त्यामुळे जिल्ह्यातील दहा मार्गावरील वाहतूक बंद होती.तर शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.सोमवारी मध्यरात्री पासून सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र शेतात पाणी साचले आहे. शेतातील शेतकऱ्यांची कपासीचे पिक पूर्णपणे पावसासाच्या पाण्याखाली गेल्यामुळे पिवळी पडली असुन, शेतकऱ्यांच्या सोयाबिनच्या घुगऱ्या झाल्या आहेत त्याच बरोबर तुर पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे
. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असुन सर्व शेतकरी वर्ग हतबल झाला असुन ,शेतकऱ्यांनपुढे जिवन जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. राजाने झोडपले, पावसाने हानले.तर दाद कुणाकडे मागायची, त्यामुळे सरकारने पुर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान मदतीची घोषणा करावी अशी मागणी वालुर येथील शेतकऱ्यांनकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here