उद्या काँग्रेसच्या वतीने राजुरा बंद चे आवाहन

* लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

 

 

राजुरा :– शेतकरी विरोधी केंद्र सरकारने तीन काळे कायदे पारीत करून देशाच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने संपूर्ण भारतात उद्या दिनांक २७ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंद ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा जाहीर पाठिंबा असून लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, सविधान चौक राजुरा येथे राजुरा कांग्रेस च्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात *राजुरा बंद* ठेवून भारत बंद आंदोलन करण्यात येत आहे. तरी तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी, काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी नागरिकांनी उद्या सकाळी ठिक ९ वाजता संविधान चौक राजुरा येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहून भारत बंद यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here