कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या जन्मदिवसा निमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला भाग

By : Shivaji selokar

कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा यात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेत भाग घेतला श्री नारायण हिवरकर यांनी उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचे फार्म मुख्याध्यापक श्री जयपाल राऊत यांना दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा प्रमुख पाहुणे श्री जयपाल शा राऊत मुख्याध्यापक,श्री चौधरी सर, श्री तेलंग सर, श्री जीवतोडे सर, मडावी मॅडम गजभिये सर आदी मान्यवर उपस्थित होते तालुकाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने सेवा सप्ता म्हणून वाढदिवस साजरा करताना सामाजिक कार्य म्हणून विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन, समृद्ध भारत,सशक्त भारत भारताची जागतिक महोत्सवाकडे वाटचाल या विषयावर निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी,विद्यार्थिनी व पदव्युत्तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मुळे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी चांगली चालना मिळेल असे मनोगत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तेलंग सर यांनी केले तर आभार गजभिये सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here