विश्व गौरव मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राजुरा तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*सेवा व समर्पण सप्ताह दिन साजरा*

*मा.आमदार अँड संजय धोटे व मा.आमदार सुदर्शन निमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती*

भारतीय देशाचे कर्णधार,देश गौरव मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,कार्यक्रमा प्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्त्याना शाल,श्रीफळ व भेट वस्तू देण्यात आली,यावेळी उज्वला गॅस योजना,शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत लाभ मिळालेल्या या सर्व मान्यवर लाभार्त्याचा,तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच साखरी येथील अपंग निराधार दिलीप मधुकर झुंगरे यांना आर्थिक मदत देण्यात आली,माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकाराने व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

तसेच राजुरा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जेष्ठ गुणवान,सेवा समर्पित व्यक्तीचा सन्मान करण्यात आला,राजुरा मुक्ती संग्राम दिनाचे औचित व देश गौरव मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा व समर्पण सप्ताह दिन मनुन विविधकार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले,यावेळी राजुरा मुक्ती संग्राम कुंटुबियांचे व्यक्ती म्हणून अँड मुरलीधर धोटे, डॉ सुरेश उपगनलावार,विनायक देशमुख यांचा सन्मान करण्यात आला,मादगी समाजातील प्रथम व्यक्ती वकील झाल्याबद्दल अँड मोहन कलेगुरवार यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की,भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे देशाला मोठया महासत्ते कडे नेण्याचे कार्य करत आहे,त्यांच्या सात वर्षाच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागले आहे,त्यांनी लहनातील लहान व मोठ्यातील मोठ्या व्यक्तींना न्याय देण्याचे प्रयत्न केले आहे,अनेक केंद्रातील योजनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लाभ दिला असून अश्या देश गौरव पंतप्रधानाचा वाढदिवस लाभार्त्याचा सत्कार करून साजरा करत आहो,त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो, यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनाही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देश गौरव पंतप्रधान आपल्याला लाभला त्याचा आपल्याला अभिमान आहे,पुढील मोठ मोठे कार्य त्यांच्या हातून होईल अशी आशा बाळगतो,यावेळी मंचावर उपस्थित, माजी आमदार अँड संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,भाजपाचे आदिवासी नेते वाघूजी गेडाम,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे,नगरसेवक राधेश्याम अडानिया, श्रीराम सेवा समितीचे मान्यवर,सतीश कोमरपल्लीवार, नगरसेविका उज्वला जयपूरकर, भाजपा जिल्हा सचिव हरिदास झाडे,संजय उपगनलावार, भाऊराव चंदनखेडे,आदी मान्यवर उपस्थित होते,

कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजपचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे यांनी सूत्रसंचालन तालुका महामंत्री प्रशांत घरोटे यांनी केले,यावेळी कार्यक्रमाच्या यशवेशीसाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,भाजपा नेते दिलीप गिरसावळे,भाजपचे नेते गणेश रेकलवार,भाजपा नेते महादेव तपासे,विलास खिरटकर,रमेश मेश्राम,भीमराव पाला,मंगेश श्रीराम,चिंचोलीच्या उपसरपंच पुष्पाजंली धनवलकर, सौ ममता केशेट्टीवर,रवि गायकवाड,प्रकाश आस्वले,तुलाराम गेडाम,संदीप गायकवाड,महेश रेंगुंडवार,जनार्धन निकोडे,कैलास कार्लेकर,मारोती जानवे,जितेंद्र देशकर,रामस्वामी रावला,राजू निषाद,संदीप मडावी महेश वासेकर यांनी अथक परिश्रम घेतले,यावेळी भाजपा कार्यकर्ते व श्रीराम सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here