“कोरोना काळात बैलांना मास्क लावुन साधेपणाने केला पोळा सण साजरा”

By mahadev giri

सद्यस्थितीला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असल्याने वालुर येथील शेतकऱ्यांनी अतिशय साध्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला. वालुर येथील सरपंच संजयजी साडेगावकर यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले होते कि,सद्यस्थितीला कोरोना विषानुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोळा हा सण अतिशय साधेपणाने साजरा करावा. सरपंच संजयजी साडेगावकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत येथील शेतकऱ्यांनी अतिशय साधेपणाने पोळा हा सण साजरा केला. वालुर येथील शेतकरी शिवाजी सोनवने , गंगाराम सोनवणे, अंजाराम सोनवणे या शेतकरी बांधवांनी बैलांप्रती जिव्हाळा बाळगून बैलांच्या तोंडाला देखील मास्क लावून बैलांचे पुजन करूनअतिशय साधेपणाने मिरवणूक काढुन सामाजिक भान जपले. सोनवणे बंधूनी बैलांच्या तोंडाला मास्क लावून सामाजिक भान जपल्याने त्यांच्या माणुसकीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here