बिटस्तरीय सांस्कृतिक स्पर्धत आसन खुर्द शाळा सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन

by : Shankar Tadas

कोरपना :

बिटस्तरीय सांस्कृतिक स्पर्धत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द ही शाळा सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी पटकावत यश संपादन केले.
दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 ला खिरडी येथे पार पडलेल्या बिटस्तरीय खेळ क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत एकूण 6 स्पर्धा घेण्यात आल्या.त्यापैकी आसन खुर्द शाळेने सहा पैकी दोन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर दोन स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावत बाजी मारली. वैयक्तिक गायन, वैयक्तिक नक्कल यात प्रथम क्रमांक पटकाविला तर समुहगायन व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसरात उपक्रमशील शाळा म्हणुन ओळखली जाते.नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत ही आसन खुर्द शाळेने दैदिप्यमान कामगिरी केली होती.पुन्हा एकदा या शाळेने सांस्कृतिक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक साधत चॅम्पियन ट्रॉफी वर आपले नाव कोरले.
यशस्वी विद्यार्थांना शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम पाचभाई, शिक्षक मारोती सोयाम, संजय निखाडे, तुकाराम धंदरे यांनी मार्गदर्शन केले.
कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. सचिनकुमार मालवी साहेब,केंद्राचे केंद्रप्रमुख मा. पंढरी मुसळे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here