अखेर पिपरबोडी येथे दारुबंदीचा निर्णय

by : Dharmendra Sherkure

वरोरा : पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा (पारधी टोला) पिपरबोडी येथे अखेर दारूबंदी चा एकमताने निर्णय घेण्यात आला. चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी टोला पिपरबोडी हे लहानसे गाव आहे. जेमतेम गावची तीनशे लोकसंख्या. परंतु  चार घरी दारु विक्री होत होती.  किशोर वयातील मुले दारूच्या आहारी गेले. गावातील महिला दारूड्या पतीच्या त्रासापाई कंटाळलेल्या होत्या. हनुमान मंदिर देवस्थान कमेटिच्या पदाधिकाऱ्यांनी दारु विक्रेत्यांना एका महिन्यापूर्वी  दारूबंदी बाबत सुचनाही दिल्या होत्या. अनेकदा आपण आपआपसात भांडण तंटे व्हायचे पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी च्या चकरा व्हायच्या, दिनांक १६ फेब्रुवारी ला हनुमान देवस्थानचे पदाधिकारी, चिनोरा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गावातील चौकात सभा बोलावली,दारू विक्री या नंतर करू नये, केल्यास पोलीसांना तक्रार देण्यात येईल अशी दारूविक्रेत्यांना तंबी देण्यात आली, यानंतर गावात दारू आम्ही विकणार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, सभेला आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे,चिनोरा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सुशिला तेलमोरे, सदस्य गजानन भोयर, ञिशुल निबुधे, श्री हनुमान मंदिर देवस्थान चे अध्यक्ष रवींद्र शेरकुरे, उपाध्यक्ष नेपाल शेरकुरे, कोषाध्यक्ष सुनील घोसरे,वामण नन्नावरे,सदाशिव नन्नावरे, दिवाकर नन्नावरे, राजेश्वर नन्नावरे, प्रमोद घोसरे ,वामण नन्नावरे, प्रवीण नन्नावरे, अमोल घोसरे,व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *