बारव्हाच्या महिलांनी गाजविली ग्रामसभा

By : Dharmendra Sherkure

वरोरा :

वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत बारव्हा येथे २६ जानेवारी निमित्त खास महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसगी गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं सभेत उपस्थिती दर्शवून महिलांनी विविध मागण्या मांडून महीला ग्रामसभा गाजवली.या ग्रामसभेत बारव्हा ग्रामपंचायतच्या सरपंच जोसनाताई मेश्राम, उपसरपंच संध्याताई कारेकर, ग्रामसेवक गोविंदराव ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य व बचत गटातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,या महिला सभेत ग्रासरुट लिडरशिप कार्यक्रमाचे फेलो सुषमाताई चाफले व महिलानी मिळून महिलांच्या गृहकर पावतीवर आहे परंतु घरासमोर पती पत्नी दोघांचेही नाव असलेली नेम प्लेट सपुर्ण गावामध्ये लावून देण्यात यावे, गावामध्ये शंभर टक्के विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरुन महिलांना आधार कार्ड काढण्यास, पतीच्या मृत्युपत्रात मालकी हक्क मिळवण्यासाठी समस्या येतात, शेतीच्या सातबारावर नाव चढविण्यासाठी महिलांना समस्या येऊ नये गावातील घटस्फोटीत व विधवा परीतक्ता महिलांसाठी तिळगुळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात यावा आणि तो कार्यक्रम ग्रामपंचायत अंतर्गत बारव्हा, बोपापूर या गावामध्ये दरवर्षी घेण्यात यावा तसेच ग्रामसभेबाबत गावामध्ये नोटिस लावण्यात यावे. जेणेकरुन लोकाना ग्रामसभेची माहिती होईल व महिलांची उपस्थिती वाढेल इत्यादी मागण्या महिला ग्रामसभेत करण्यात आल्या ही ग्रामसभा उत्स्फूर्त पुणे महिलांच्या उपस्थितीत यशस्वी झाली. यावेळी बारव्हा, बोपापुर गावांतील शेकडो महिलांची महीला सभेत उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *