वरोरा नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले!* *आरक्षण सोडत जाहीर ; यावेळी २४ ऐवजी २६ नगरसेवक

लोकदर्शन👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर वरोरा नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी सदस्यांची आरक्षण सोडत प्रक्रिया आज नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. सन २०११ च्या जनगणनेस प्रमाण मानून ही आरक्षण सोडत जाहीर झाली. मागील पंचवार्षिक काळात नगर परिषद सदस्यांची संख्या २४ होती. त्यात यावेळी २ ने वाढ होऊन ती २६ झाली आहे. पारदर्शकता जपण्यासाठी लहान मुलांच्या हातून चिठ्ठ्या काढून आरक्षित प्रभाग जाहीर करण्यात आले.
वरोरा नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यानुसार वरोरा नगर परिषद निवडणूक १३ प्रभागातून घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी द्विसदस्यीय प्रभाग पद्धत असून प्रत्येक प्रभागातून २ असे २६ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. यात ३ जागा अनुसूचित जाती, ३ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यापैकी २ जागा अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी व ९ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राहणार आहे.
नगर परिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या ४६,५३२ ( सन २०११च्या जनगणनेनुसार ) आहे. दोन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या ३,५७९ असून कमाल लोकसंख्या ३,९३७ तर किमान ३,२२१ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ५,१८४ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५,२८५ आहे. निवडून द्यावयाच्या नगर परिषद सदस्यांची संख्या २६ असून प्रभागाची एकूण संख्या १३ आहे.

*वरोरा न.प.चे प्रभाग निहाय आरक्षण*

*प्रभाग क्रमांक* : *१ अ* – अनुसूचित जमाती महिला ( एस.टी.),
*१ ब* – सर्वसाधारण प्रवर्ग

*प्रभाग क्रमांक* : *२ अ* – सर्वसाधारण महिला
*२ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *३ अ* – अनुसूचित जाती महिला ( एस.सी.)
*३ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *४ अ* – सर्वसाधारण महिला
*४ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *५ अ* – अनुसूचित जमाती महिला
*५ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *६ अ* – सर्वसाधारण महिला
*६ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *७ अ* – अनुसूचित जाती सर्वसाधारण
*७ ब* – सर्वसाधारण महिला

*प्रभाग क्रमांक* : *८ अ* – अनुसूचित जमाती सर्वसाधारण
*८ ब* – सर्वसाधारण महिला

*प्रभाग क्रमांक* : *९ अ* – सर्वसाधारण महिला
*९ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *१० अ* – सर्वसाधारण महिला
*१० ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *११ अ* – सर्वसाधारण महिला
*११ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *१२ अ* – सर्वसाधारण महिला
*१२ ब* – सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक* : *१३ अ* – अनुसूचित जाती महिला
*१३ ब* – सर्वसाधारण

यावेळी आरक्षण सोडतीसाठी पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, नगर परिषद मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले. वरोरा नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक गजानन आत्राम, सहाय्यक नगर रचनाकार विनोद कांबळे, चंद्रशेखर भगत, भूषण सालवटकर, सुरेश पाचभाई प्रामुख्याने उपस्थित होते.
खेळीमेळीच्या वातावरणात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार, नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी उपस्थित होते.
नगर परिषद सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येईल. आरक्षणासंदर्भात अंतिम अधिसूचना २ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे यावेळी पीठासीन अधिकारी यांनी सांगितले.

*प्रभाग रचना बदलाने अनेक इच्छुक हिरमुसले*
सन २०११ च्या जनगणनेनूसार ४६,५३२ लोकसंख्येस प्रमाण मानून मागील सार्वत्रिक निवडणुक पार पडली होती. त्यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्यात आली होती आणि नगरसेवकांची संख्या २४ होती. यावेळेसही सन २०११ची जनगणना प्रमाण मानून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून सदस्य संख्या मात्र २६ करण्यात आली आहे. मागीलप्रमाणेच प्रभाग रचना असली तरी लोकसंख्येला आधार मानून ती बदलली. दोन सदस्य वाढल्याने पूर्वीच्या प्रभागाची तोडफोड करून नूतन प्रभाग तयार करण्यात आला. या निवडणुकीत केवळ आरक्षणात बदल होईल व पूर्वीचे प्रभाग जसेच्या तसे राहतील, असा गोड समज करून अनेक इच्छुकांनी मनसुबे आखून गुडघ्याला बा़शिंग बांधून ठेवले होते. परंतु प्रभाग रचनेत बदल झाल्याने अपवाद वगळता अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. परिणामतः आरक्षण सोडतीनंतर बहुसंख्य इच्छुक हिरमुसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक जाहीर झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक तारखेपर्यंत आरक्षण मिळेल, अशी आशाही काहीजण बाळगून आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *