Home
Home Breaking News *डॉ. खत्री महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन संपन्न*

*डॉ. खत्री महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन संपन्न*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने वाढते तापमान लक्षात घेता पक्ष्याच्या जीवनाचा विचार करून महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील झाडांना मातीची भांडी बांधून पक्ष्याना पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दर वर्षी हा उपक्रम या विभागाच्या वतीने राबविण्यात येतो, वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली पृथ्वीच्या सध्या स्थिती मागील मुख्य कारण आहे. आपल्या वसुंधरेचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारी चे स्मरण करून देने हेच या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. जे. एम. काकडे सोबत आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एन. आर. दहेगावकर, पर्यावरण शास्त्र विभागाचे डॉ. एम. जी. ठाकरे, डॉ. एस. के. गुडधे, तसेच डॉ. तेलखडे सोबत पर्यावरण शास्त्र चे सर्व प्राध्यापक आणि बरेच विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here