सीबीएसई दहावीच्या निकालात इन्फंट कान्व्हेंटची उत्कृष्ट कामगिरी.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– दिनांक २२ जुलै २०२२ रोजी इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करीत बाजी मारली असून उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा इन्फटने कायम राखली आहे.
यात प्रज्वल आर. तुराणकर ने ९७. २% गुण घेऊन इन्फट कान्वेंट मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. सुखदा जितेंद्र देशकर ने ९४. ८% गुण मिळवून द्वितीय तर हर्ष एस. चव्हाण ने ९३. २% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर कु. श्रावणी एन. लिखार ने ९१. ६% आणि अनिस मधुकर साळवे ने ९१. ४ % गुण घेऊन अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक सत्र सन २०२१-२०२२ या वर्षी इयत्ता दहावी सीबीएसई च्या परिक्षेसाठी एकूण ५९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ३१ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ४ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here