Home
Home राजुरा कल्याण नर्सिंग काँलेज येथे फ्रेशर्स पार्टी आणि पर्यावरण दिनाचे आयोजन.

कल्याण नर्सिंग काँलेज येथे फ्रेशर्स पार्टी आणि पर्यावरण दिनाचे आयोजन.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित uh कल्याण नर्सिंग काँलेज राजुरा येथे बी. एस्सी नर्सिंग, जी. एन. एम आणि ए. एन एम प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच फ्रेशर्स पार्टी मध्ये बी. एस्सी नर्सिंग प्रथम वर्षातून मिस्टर फ्रेशर्स – साहील आस्कर तर मिसेस फ्रेशर्स – साक्षी कोकडे, जी एन एम प्रथम वर्षातून मिस्टर फ्रेशर्स शुशांत अधिकारी मिसेस फ्रेशर्स मयुरी साडवे यांची निवड विद्यार्थ्यांद्वारा करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अभिजीत धोटे, बी. एस्सी नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, जी एन एम व ए एन एम च्या प्राचार्या पुजा गीते, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here