Home
Home राजुरा राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार

राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– चंद्रपूर काँग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी आमदार सुभाष धोटे यांची आज सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, त्यांच्या या निवडीमुळे महिला काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती निर्मला कुडमेथे, पुनम गिरसावळे, रेखाताई बोढे, शुभांगी खामनकर, पुष्पवर्षा जुलमे यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here