पिपरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय

 

लोकदर्शन👉 मोहन भारती


*⭕ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा ५२ मतांनी विजय*

*⭕काँग्रेस-शेतकरी संघटना युतीचा पराभव*

कोरपना तालुक्यातील पिपरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सौ.ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांनी १२९ मतदान घेत काँग्रेस-शेतकरी संघटना युतीच्या संगीता सत्यवान मोहितकर यांचा तब्बल ५२ मतांनी पराभव केला.ही भारतीय जनता पार्टीची निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली.

पिपरी ग्रामपंचायतची प्रभाग क्र.३ची जागा रिक्त झाल्यामुळे सदर जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली,सदर प्रभागात भारतीय जनता पार्टीतर्फे ज्योतीताई वसंता जेनेकर व काँग्रेस-शेतकरी संघटनेतर्फे संगीता सत्यवान मोहितकर ह्या उमेदवार होत्या.सदर निवडणूकित एकूण २३१ मतदान होते व २०८ मतदान निवडणूकित मतदारांनी केले.यामध्ये ज्योतीताई जेनेकर यांना १२९ मतदान व संगीताताई मोहितकर यांना ७७ मतदान प्राप्त झाले.यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्योतीताई जेनेकर यांचा ५२ मतांनी विजय झाला.

या निवडणुकीत महादेव पावडे,माजी सरपंच कवडू कुंभारे,वसंता जेनेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल चांदेकर,विलास चालकेर,भाऊजी तिखट,पुंडलिक देवतळे,रामदास चालकेर, दयानंद देवतळे,गुलाब मेश्राम,भिवाजी देवतळे,मधुकर जेनेकर,मनोहर झाडे,रमेश तुराणकर,देविदास काकडे,तुळशीराम तिखट,रामदास तिखट,ग्रामपंचायत सदस्य साईनाथ तिखट,सागर झाडे,रमेश तिखट,किशोर पावडे,विनोद तिखट,बंडू पावडे,मधुकर चांदेकर,लक्ष्मण रामटेके,गिरीधर मेश्राम,दत्ता हेपट, जगदीश गुंजेकर, चंद्रशेखर आंबेकर,बाळा ढेंगळे,सुभाष तिखट,श्रीराम तिखट,देविदास तिखट,गजानन तुराणकर,संतोष चांदेकर, चंद्रभान मेश्राम,सुभाष चालेकार,नितेश चालेकर,गौरव तिखट,सत्यशील रामटेके,कपिल रामटेके,अरविंद तिखट,उमेश तुराणकर,संतोष चौधरी,रोशन मेश्राम,सुनील तिखट,मंगेश काकडे,रणजित देवतळे, संतोष हेपट, मानव झाडे,अमोल चांदकेर, कपिल तिखट,चंद्रशेखर तिखट,देवीदास तिखट इत्यानी अथक परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *