अमलनाला परिसरात आढळली मृत जनावरे. कारण गुलदस्त्यात

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर- औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर शहर येथील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात मृत जनावरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत जनावरे कोणी टाकली व का टाकली याचे कारण गुलदस्त्यात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून केव्हाही पावसाची शक्यता आहे. अशावेळी ते मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमल नाला चे पाणी गडचांदूर आणि नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते अशा स्थितीत मृत जनावरे आढळल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळून आले असताना त्याकडे कोणत्याच विभागाचे लक्ष गेले नसेल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही मृत जनावरे कशानी मृत पावली याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

या आधी ही असल्याच प्रकारे मृत गोवंश हे इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली गेली होते. स्थानिकांनी विरोध केल्यावर आता मृत जनावरे ही बैलमपुर शिवारात टाकण्यात आल्याचे कळते. गडचांदूर हे आंतर राज्यिय गोवंश तस्करीचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले असून वाहतूकी दरम्यान मरण पावलेली जनावरे निर्जन स्थळी टाकण्यात तर येत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *